...म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा रद्द केला असावा - अजित पवार

अजित पवार
अजित पवार

गडचिरोली । Gadchiroli

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) काल दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. परंतु अचानक सायंकाळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला...

यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीला जाणार होते, परंतु त्यांना ज्यांना भेटायचे होते त्यांनी वेळ दिली नसावी. कारण, दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचा असतो, असे म्हणत पवार यांनी भाजपा (BJP) श्रेष्ठींकडे शिंदेंसाठी वेळ नाही, या विधानाकडे लक्ष वेधले.

पवार पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन २७ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, ते म्हणतात आम्ही दोघे काम करत आहोत. मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढे मोठे बहुमत मिळाले आहे, त्यांनी ते विधानसभेत (Legislative Assembly) दाखविले देखील आहे. मग मंत्रिमडळ विस्तार (Cabinet expansion) का करत नाही. असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची (Farmers) पहिली पेरणी (sowing) वाया गेली असून दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, पण ते गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी अद्याप मिळालेली नाही.” असेही अजित पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com