अजित पवार पुन्हा करोना पॉझिटिव्ह; बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

अजित पवार पुन्हा करोना पॉझिटिव्ह; बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह (corona positive) आली होती. तेव्हापासून ते विलगीकरणात होते. त्यानंतर त्यांनी आपली करोना चाचणी केली असता ती पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे...

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत (shivsena mla) बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas aaghadi) पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (bjp) नवीन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले.

दरम्यान, या बहुमत चाचणीसाठी (floor test) ३ व ४ जुलैला विशेष अधिवेशन (Special session) बोलावण्यात आले आहे. यावेळी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे अजित पवार यांनी आपली करोना चाचणी करून घेतली. मात्र, त्यांच्या या चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या बहुमत चाचणीस करोनाच्या नियमांचे (corona rules) पालन करत उपस्थित राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com