Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यामालेगावी दंगल घडविण्याचा कट : माजी आ. शेख रशीद यांचा आरोप

मालेगावी दंगल घडविण्याचा कट : माजी आ. शेख रशीद यांचा आरोप

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मनपा निवडणुकीसाठी (Municipal corporation) काहीच मुद्दे नसल्याने राजकिय लाभ मिळावा, यासाठी हिंदू-मुस्लीम (Hindu Muslim) समाजात वाद निर्माण करून शहराला अशांत करत आगीत झोकण्याचा प्रयत्न काही लोकांतर्फे सुरू आहे. शहराला पुन्हा दंगलीच्या माध्यमातून आगीत लोटणार्‍यांचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडावेत. तसेच शहरातील दोन्ही समाजातील युवकांनी सावध रहात कुणाच्याही दिशाभूलीस बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद (NCP ex mla Shaikh rashid) यांनी येथे बोलतांना केले….

- Advertisement -

शहरातील नूरबाग (Nurbag) येथे जानी बेग (Jani beg udyan) उद्यानात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकिय लोकांतर्फे स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू असल्याचा आरोप केला.

ते पुढे म्हणाले, शहराचे वातावरण खराब व्हावे, अशी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आपल्या दृष्टीस पडले आहे. पूर्वी राजकिय स्वार्थासाठी अशाच पध्दतीने वातावरण दुषित करून शहराला आगीच्या वणव्यात लोटले जायचे.

आता देखील वातावरण कलुषित होण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. मुस्लीम वस्तीत असलेल्या उर्दूघरावर भगवा ध्वज लावण्याचा तर राष्ट्रीय एकात्मता चौकास मुस्कान खानचे नाव द्यायचे किंवा संवेदनशील स्थळी हिरवा झेंडा लावायचा; असा प्रयत्न काही राजकिय लोकांतर्फे करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करीत शेख रशीद पुढे म्हणाले, या प्रकाराची माहिती पोलीस अधिकार्‍यांना देखील मिळाली आहे.

त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उर्दूघरावर (Urdu Home) पोलीस बंदोबस्त (police Deployment) तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कशाही पध्दतीने वातावरण कलुषित होऊन शहर आगीत लोटले जावे, यासाठीच हा उपद्व्याप सुरू आहे. अशा लोकांवर आपलेच नाही तर पोलीस यंत्रणेचे देखील लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

दि. 12 नोव्हेंबरच्या मालेगाव बंद (Malegaon Bandh) दरम्यान झालेल्या घटनेच्या प्रकरणात जे तरूण तुरूंगात आहेत, ते बाहेर येऊ नयेत, यासाठीच शहराचे वातावरण खराब करण्याचा हा उद्योग असल्याचा आरोप करीत शेख रशीद पुढे म्हणाले, शहराचे वातावरण खराब करण्यासाठी स्वत:ची राजकिय परिस्थिती खराब असलेल्या राजकिय पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा देखील झाली आहे.

हा सर्व प्रकार निश्चितच गंभीर असल्याने पोलीस यंत्रणेने (Police Dept) अशा लोकांची सखोल चौकशी केली पाहिजे. काहींना झटपट ने ता व्हायचे आहे. त्यामुळे काहीही वादग्रस्त वक्तव्ये केली जातात.

मुस्कान खान (muskan khan) या विद्यार्थीनीने हिजाबला विरोध करणार्‍यांना धाडसाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळेच उर्दूघर या शैक्षणिक संकुलास तिचे नाव देणे संयुक्तीक आहे. मुस्कानच्या नावाला विरोध करणारे समाजाचे दुश्मन आहेत.

आम्ही मुलीने दाखविलेल्या शौर्याचा गौरव केला आहे. ती मुलगी दुसर्‍या समाजाची राहिली असती तरी आम्ही गौरव केलाच असता. स्व. आयेशा हकिम यांचे नाव जलशुध्दीकरण केंद्रास, मनपा सभागृहास स्व. निहाल अहमद यांचे तर हज हाऊसला स्व. हाजी शब्बीर अहमद यांचे नाव कुणीही मागणी केलेली नसतांना आम्ही ठराव करत दिले आहे.

ज्यांना राजकारण करायचे तेच मुस्कानच्या नावास विरोध करत असल्याचा आरोपही शेख रशीद यांनी केला. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शकील बेग (Shakil beg) यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या