पुढील राजकीय वाटचालीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोणतीही राजकीय समीकरणे ही कायमस्वरूपी नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदेंसमवेत (Eknath Shinde) शिवसेनेचा (Shivsena) मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) एकत्र राहणार की विभक्त होणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.

तर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) समविचारी पक्षांनी एकत्र राहावे या भूमिकेचा सातत्याने पुनरुच्चार करत आहेत. तसेच एक गट अजूनही पवार पंतप्रधान होऊ शकतात असा दावा करत आहे. त्यानंतर आता यावर खुद्द शरद पवारांनीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी महत्वाचा खुलासा केला आहे. पवारांनी ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी पवारांना पत्रकारांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारणा केली असता त्यांनी मोरारजी देसाईंचे (Morarji Desai) उदाहरण देत म्हटले की, 'मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही. माझे वय ८२ आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८२व्या वर्षी पंतप्रधान (PM) झाले. मोरारजींचा कित्ता मी काही चालवू इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

तसेच या देशातल्या सामान्य लोकांच्या यातना, समस्या सोडवण्यासाठी विविध राजकीय विचारांच्या लोकांना हातभार लावावा हे सूत्र माझे आहे. मी आता सत्तेची जबाबदारी घेणार नाही, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com