
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे...
शरद पवारांना नोव्हेंबर महिन्यात तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तब्येत बरी नसतांना सुद्धा ते शिर्डीमध्ये (Shirdi) राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. त्यावेळी पुन्हा ते रुग्णालयात आले होते. तसेच मार्च महिन्यात शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) सुद्धा करण्यात आली होती.
दरम्यान, त्यानंतर आता आज पुन्हा एकदा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्या डोळ्याची (Eye) उद्या मंगळवार (दि.१०) रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. याअगोदर त्यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती.