आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार बोलले, म्हणाले...

khadse pawar
khadse pawar

तुळजापूर

राज्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली जोरात रंगली आहे. या चर्चेबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केले.

राज्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली जोरात रंगली आहे. या चर्चेबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी रविवारी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी (ता.१९) तुळजापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर शरद पवार म्हणाले, खडसे साहेब विरोधी पक्ष नेते होते. गेली २५ वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. राज्याचे अर्थमंत्रीही होते. त्यांनी एका पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचे फार मोठे योगदान होते. त्यांनी केलेल्या कष्टाची नोंद कदाचित घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना जिथे नोंद घेतली जाते तिथे जावे का? असे वाटत असेल. तसा ते विचार करत असतील. जर त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचे? असे सूचक विधानही पवारांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com