Maharashtra Politics : शरद पवार लवकरच भाजपसोबत जाणार; 'या' आमदाराचा खळबळजनक दावा

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

पाच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले. शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडाला आपले समर्थन दिलेले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार शरद पवार यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवारांशी (Sharad Pawar) प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे...

शरद पवार
Nashik News : निकृष्ट रस्त्याची सरपंचाकडे तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीने दिल्लीला (Delhi) रवाना होत तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार अचानक दिल्लीला गेल्याने राज्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चा सुरू झाल्या असून शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच आता अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत यावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार
येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरच होणार पूर्ण; 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

यावेळी बोलतांना आमदार रवी राणा म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे (Maharashtra) ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मोदींसोबत यावं, ज्यामुळे राज्याचे भले होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनतेची कामे होतील. मला वाटतं की, पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी मान्य केल्या असतील. कुठेतरी पवार साहेबांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेली आहेत. लगेच अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तेथे राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल. मोदीजींचे काम बघून नक्कीच पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील, असे सध्या चित्र दिसत आहे असे राणा यांनी म्हटले आहे.

शरद पवार
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक फाडले; जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप, म्हणाले...

पुढे ते म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसचे (Congress) अनेक नेते मोदीना पाठींबा देतील. तसेच विरोधी पक्षात कमी लोक राहतील, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. राणा यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच मंत्रीपदाबाबत बोलतांना राणा म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही आणि मला मंत्रीपदात इंटरेस्टही नाही. जनतेचे प्रश्न आणि जनतेचा विकास हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मी कधीच विस्ताराबद्दल विचारले नाही आणि त्याची अपेक्षाही नाही, असेही रवी राणा यांनी सांगितले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शरद पवार
PM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला १५ वा हफ्ता जमा होणार
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com