शरद पवारांचा भाजपवर निशाणा;म्हणाले, दिल्लीसमोर...

शरद पवार
शरद पवार

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही वर्षात देशात मोठे बदलाव आले आहेत. शेतकरी (Farmer) देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो. देशाला शेतकऱ्यावर गौरव आहे. पण शेतकऱ्यांच्या दुखत आत्महत्या (Suicide) होत आहे.

आपल्या देशात ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांवर गर्व आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात मोठा रोष असून शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्रितपणे लढण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे...

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय कार्यकारणी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकायचे नाही, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला.

ते पुढे म्हणाले की, देशात महागाई (Inflation) वाढली असता. भाजपचे नेते देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा दावा करतात. तसेच इंग्लंडला (England) मागे टाकल्याचा दावा करत असून भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या तुलनेत फार कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress) शेतकऱ्यांचा पाठीशी उभा राहणारा पक्ष असून ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी येतील, त्या त्यावेळी राष्ट्रवादी लढण्यासाठी मैदानात उतरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com