भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार
शरद पवार

मुंबई

पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव (bhima koregaon) प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र विशेष NIA न्यायालयात दाखल केले आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता.

केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. 2 ऑगस्टपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील व पवार यांनाही समन्स बजावले जाईल, असे चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते म्हणाले. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.

भीमा कोरेगाव (bhima koregaon) प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com