सुप्रिया सुळेंनी केला शरद पवारांचा फोटो ट्विट

शरद पवार
शरद पवारsharad pawar

मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.

ही शस्त्रक्रिया होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे नेते रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी या सर्वांसोबत एक फोटो ट्वीट केला आहे. यासोबतच त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

पुन्हा एक शस्त्रक्रिया होणार

शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com