Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून शरद पवारांचा खान्देश दौरा अचानक रद्द

…म्हणून शरद पवारांचा खान्देश दौरा अचानक रद्द

मुंबई | प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पहिलाच उत्तर महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. दौरा अचानक रद्द झाल्याने अनेक तर्क वितर्क निघू लागले असतानाच खरे कारण समोर आल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रोहिणी खडसे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे एकनाथ खडसे यांनाही स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला नियोजित दौरा हा तुर्तास रद्द करावा लागला असून लवकरच ते काही दिवसांनी दौऱ्यावर येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या