Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखडसेंच्या भेटीबावत पवारांनीच केला खुलासा, म्हणाले...

खडसेंच्या भेटीबावत पवारांनीच केला खुलासा, म्हणाले…

मुंबई

गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर आता स्वत: शरद पवार यांनीच खुलासा केला आहे.

- Advertisement -

खडसेंनी आणखी एका पक्षाकडून ऑफर, दिले हे सूत्र

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा बुधवारी रंगली आहे. त्यावर एका वाहिनीशी बौलतांना शरद पवार यांनी यानीच भेटीचे वृत्त फेटाळले. ते म्हणाले, एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे.

दरम्यान, भाजपच्या पक्ष बैठकीसाठी मुंबईत आल्याची माहिती श्री खडसे यांनी देशदूतशी बोलताना दिली. श्री.खडसे कालपासून मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा पुन्हा जोरात!

- Advertisment -

ताज्या बातम्या