Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापत्राचाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

पत्राचाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळयाप्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बैठक घेतल्याचा आरोप भाजपने (BJP) केला होता. या आरोपानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, ईडीचे (ED) आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे शरद पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पत्राचाळप्रकरणी न्यायालयात (Court) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात माझे नाव असल्याचे म्हटले जात आहे. चौकशी करणाऱ्या संस्थेने कोर्टात काय सांगितले? तसेच तेव्हा राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केला तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे पवारांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या