Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर शरद पवारांचा खोचक टोला

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा खोचक टोला

पुणे । Pune

राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे (BJP & Shinde group) सरकार स्थापन झाले आहे. या सरकार स्थापनेनंतर आता भाजपमधून खदखद समोर आली आहे. आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा समाचार आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष (Nationalist Congress President) शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला आहे…

- Advertisement -

यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना पवार म्हणाले की, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच त्यानंतर हसत दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका पत्रकाराकडे पाहत पवारांनी “त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला.

दरम्यान, यापूर्वी शरद पवारांनी शिवसेनेतील (shivsena) ४० आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी, असे मत शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यासंदर्भात नोंदवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या