शरद पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले...

शरद पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले...

नवी दिल्ली | New Delhi

देशातील वेगवगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी पक्षाची भूमिका महत्वाची असते. मात्र, देशात सध्या विचित्र स्थिती असून लोकशाहीमध्ये जनतेने निर्णय घेतला. परंतु सत्ताधारी पक्षामुळे देशात समस्या निर्माण झाल्या असून भाजपचे (BJP) नेते सांगतात वेगळे आणि करतात वेगळे अशी स्थिती आहे.

देशात ७० टक्के ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे २०२४ मध्ये देशाचा नकाशा बदलू शकतो. त्यासाठी विरोधकांनी मिळून लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. ते दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना ते सतत भाजपच्या विरोधात लिहित होते म्हणून अटक झाली. तसेच त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली असून देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. असे पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे १५ ऑगस्टचे भाषण सर्वांनी ऐकले. त्यात ते महिलांविषयी खूप चांगले बोलले, महिलांच्या (women) सन्मानाविषयी बोलले.

एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचे आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार (Gujarat Goverment) एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देते. बिल्किस बानोंवर (Bilkis Bano) कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे, असेही पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com