शरद पवारांचे वंचितसोबतच्या आघाडीबाबत मोठे विधान; म्हणाले...

शरद पवारांचे वंचितसोबतच्या आघाडीबाबत मोठे विधान; म्हणाले...

मुंबई | Mumbai

मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्याचे जाहीर केले होते...

त्यानंतर दोनच दिवसांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचेच (BJP) असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज कोल्हापूर (Kolhapur) येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतांना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. तसेच आमची आणि वंचित बहुजन आघाडीची अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे आम्ही चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं. असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देतांना पवार म्हणाले की, कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. पण आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com