
सोलापूर | Solapur
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार संबोधनासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरु होताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं.