Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाने पटकावले ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद

महाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाने पटकावले ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद

नवी दिल्ली | प्रतिनिधी | New Delhi

महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे (Pradhan Mantri Banner) विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान मिळविला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला…

- Advertisement -

दिल्लीतील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर (Kariappa Ground) आयोजित एनसीसी रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर २०२२ – २३ च्या विजेत्या व उपविजेत्यांसह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २८ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन (Republic Day) शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू, पदुच्चेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

तसेच यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी ‘प्रधानमंत्री बॅनर’ स्विकारले.

दरम्यान, महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी १८ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. त्यानंतर यावर्षीही महाराष्ट्राने (Maharashtra) हा बहुमान मिळविल्याने तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या