Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रक्रूझ ड्रग्ज पार्टी : NCB ने आरोप फेटाळले, म्हणाले...

क्रूझ ड्रग्ज पार्टी : NCB ने आरोप फेटाळले, म्हणाले…

मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करुन (Cruise drug bust) काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा (bollywood) स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला (aryan khan) अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यातील मनिष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे. के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती NCB चा अधिकारी नव्हता, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक (Nawab Malik)यांनी पत्रकार परिषदेत केला.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

दरम्यान NCB वर झालेल्या आरोपानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. NCB च्या अधिकाऱ्यांना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत सर्व काही कायद्यानुसार झाले असल्याचे सांगितले. तपास यंत्रणेला बदनाम केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मनिष भानुशाली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईच्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी छापेमारी केली आणि ८ जणांना ताब्यात घेतलं. आर्यन खानसह आठ जणांजवळून पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे . अशी माहिती एनसीबीने आज पत्रकार परिषदेत दिली.

मोहक जसवालच्या माहितीनंतर कारवाई

मोहक जसवालच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. मनिष भानुशाली आणि के.पी.गोसावी हे पंच म्हणून घटनास्थळी आले होते. सर्व काही कायद्यानुसार झाल्याचे NCB कडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या