ड्रग्स पार्टी : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला कोठडी

ड्रग्स पार्टी : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला कोठडी

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील (cordelia cruise) हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर (drug party) NCB ने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. NCB नं यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला चार तासांच्या चौकशीअंती अमलीपदार्थ नियंत्रक कक्षानं (NCB) अखेर अटक केली आहे. आर्यन खानसह एकूण तीन जणांना याप्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. आता या तिघांना 1 दिवसाची कोठडी देण्यात आली आहे

ड्रग्स पार्टी : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला कोठडी
क्रुझवरील हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; शाहरुख खानचा मुलगा NCB च्या ताब्यात

ही आहेत ताब्यात घेतलेली आठ जण

1. मुनमुन धमेचा 2. नुपुर सारिका 3. इस्मीत सिंह 4. मोहक जैसवाल 5. विक्रांत छोकर 6. गोमित चोपड़ा 7. आर्यन खान 8. अरबाज मर्चेंट

तीन दिवस पार्टी

हे क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवसासाठी म्युझिकल प्रवासासाठी प्रवाशांकरता फूल पॅकेज तयार करण्यात आलं होतं. या क्रूझवर ‘Cray’Ark’ नावाने इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आले होते.

ड्रग्स पार्टी : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला कोठडी
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

5 लाखापर्यंतची एन्ट्री फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 80 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त

या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पँट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं.

ड्रग्स पार्टी : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला कोठडी
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

प्रवाशांच्या वेशात अधिकारी

एनसीबीला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी प्रवाशांच्या वेशात जहाजात दाखल झाले होते. पार्टी सुरू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यात काहीजणांच्या बॅगेत ड्रग्ज सापडले. याला कॉर्डेलिया क्रूझेसचे अध्यक्ष बैलोम यांनीही दुजोरा दिला आहे.

आठ तासांहून अधिक वेळ कारवाई

ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com