गडचिरोलीत तब्बल 13 नक्षलवाद्यांच्या खात्मा
File Photo

गडचिरोलीत तब्बल 13 नक्षलवाद्यांच्या खात्मा

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरुच

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातून आत्ताच्या क्षणाला एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी माध्यमांना दिली.

ठार झालेल्या 13 पैंकी 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचे सी-60 पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक उडाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com