बनावट नोटांचे रॅकेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली- मलिक यांचा आरोप

बनावट नोटांचे रॅकेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली- मलिक यांचा आरोप

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik)यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. आज नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवल्याचा आरोप त्यांनी केला.

बनावट नोटांचे रॅकेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली- मलिक यांचा आरोप
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यांवर अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.

बनावट नोटांचे रॅकेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली- मलिक यांचा आरोप
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

रियाज भाटी, मुन्ना यादव हे कोण

मलिक यांनी फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘नागपूरचा मुन्ना यादव यांच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे.

रियाझ भाटी दाऊद इब्राहीमचा माणूस

मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com