आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ

आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

साडेतीन शक्तिपीठापैकी असलेल्या अर्धे पीठ सप्तशृंगगडावर Saptshrungi Gad आदिमाया सप्तशृंगी देवीच्या Saptshrungi Devi नवरात्रोत्सवास Navratri Festival आजपासून सुरुवात होत आहे.

नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, भुषणराज तळेकर यांनी दिली.

दि. 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव असेल. कावड यात्रा अर्थात कोजगिरी पौर्णिमा उत्सव 19 ते 20 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या कालावधीत ट्रस्टच्या वतीने तसेच विविध संस्थांतर्फे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे.

याच कालावधीत विविध सेवाभावी संस्था सप्तशृंगगडावर व गडाकडे येणार्‍या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. गुरुवारी श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सात वाजता होणार आहे.

Related Stories

No stories found.