नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित

नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित

मुंबई | Mumbai

मुंबईतील शिवडी न्यायालयाने (Court) नवनीत राणांचे (Navneet Rana) वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. तसेच, न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे...

नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेले जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरफार करुन अनुसूचित जाती (एससी) चे प्रमाणपत्र अवैधरित्या मिळवले आणि ते प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आले.

याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात नवनीत राणांसह त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेसही आरोपी आहेत.

नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित
नाशिक : सावकारीच्या जाचामुळेच 'त्या' तिघांची आत्महत्या

नवनीत राणांच्या वडिलांचा पुकारा करण्यात आला. मात्र, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. तसेच, ते न्यायालयात हजरदेखील झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. आता नवनीत राणांच्या वडिलांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com