'ही तर लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा': नवनीत राणा

'ही तर लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा': नवनीत राणा

नवी दिल्ली | New Delhi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी, वीज तुटवडा यावर कुठलेही भाष्य केले नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री एक तरी शेतकऱ्याच्या घरी गेले का? कालची सभा ही लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे....

नवनीत राणा यांनी आज दिल्लीत (Delhi) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री बेरोजगारीवर बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ३७० कलम हटवू शकतात पण मुख्यमंत्री औरंगाबाद (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरण करू शकत नाही.

'ही तर लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा': नवनीत राणा
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

गदा हातात दिल्यावर ती घ्यावी लागते. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती फक्त स्पर्श करून सोडली. गदा तुम्हाला अनटचेबल आहे का? हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण काश्मिरात जाऊन करा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र महाराष्ट्रात हनुमान चालिसा पठण करू दिले जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा अपमान केला आहे, असे त्या म्हणाल्या.

'ही तर लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा': नवनीत राणा
शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार

औरंगजेबच्या कबरीवर ज्याने फुल वाहिली त्यावर मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही. शिवसेना औरंगजेब सेना बनली आहे का? आज जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर औरंगजेबच्या कबरीवर ज्याने फुले वाहिली त्याला त्याच कबरीत गाडले असते.

'ही तर लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा': नवनीत राणा
Visual Story : ११ वर्षानंतर शर्मिला टागोर बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तुलना लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील मुन्नाभाईशी केली. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या की, मुन्नाभाई फिल्म सुपरहिट होती. तुम्ही सुपर फ्लॉप व्हाल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.