राणा दाम्पत्याला झटका; हायकोर्टाने याचिका फेटाळली

राणा दाम्पत्याला झटका; हायकोर्टाने याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी एफआयआर (FIR) रद्द करावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र राणा दाम्पत्याला हायकोर्टाने (High Court) दणका दिला आहे.....

हायकोर्टाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे. न्या. एस. एम. मोडक आणि न्या. पी. बी. वरळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

राणा दाम्पत्याने तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्यात आली. एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे दोन एफआयआरची गरज काय? असा प्रश्न राणा दाम्पत्याकडून उपस्थित करण्यात आले होते. दोन्ही एफआयआरएकत्र करा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र ती मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.

राणा दाम्पत्याला झटका; हायकोर्टाने याचिका फेटाळली
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग : भूसंपादनासाठी जमीनींचे भाव 'असे'; जाणून घ्या सविस्तर

हायकोर्टाने म्हटले आहे की, पहिला एफआयआर सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी आहे तर दुसरा एफआयआर पोलिसी कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी आहे.

राणा दाम्पत्याला झटका; हायकोर्टाने याचिका फेटाळली
Visual Story : हार्दिक पटेलांचा नवा लूक चर्चेत; काँग्रेसला करणार बाय-बाय?

तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित होते. तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचा विसर पडला असेल तर तुमच्या विरोधात कारवाई गरजेची आहे, असे हायकोर्टाने नमूद केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com