पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का : नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा


पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का : नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Navjot singh sidhu

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर पडदा पडल्याचं वाटत असतानाच आता मोठा भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot singh sidhu)यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात चरणजीतसिंग चन्नी (charanjit singh channi)यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस (congress)पक्षश्रेष्ठीसमोर पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे.

Navjot singh sidhu
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आपल्याच पदरात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असं सिद्धूंना वाटत होतं. मात्र, सिद्धूंकडे मुख्यमंत्रीपद आलं नाही. शिवाय नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. मात्र, सिद्धूंकडे उपमुख्यमंत्रीपदही दिलं गेलं नाही. त्यामुळे ते नाराज होते. तसेच खातेवाटप करतांनाही त्यांची मते विचारात घेतली गेली नाही.

Navjot singh sidhu
रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

काय म्हटले राजीनामा पत्रात

नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi)यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे

Related Stories

No stories found.