जे नाव दिले ते एकनाथने दिले त्यास माझा विरोध नाही - मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New mumbai international airport) दि. बा. पाटील यांचे नाव एकनाथने (Eknath) दिले आहे. या नावाला माझा अजिबात विरोध नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister udhav thackeray) यांनी सांगितले. त्यामुळे या विमानतळाला दि.बा. पाटील (Di Ba Patil) यांचे नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. आज मुख्यमंत्र्याच्या समवेत मातोश्रीवर (Matoshree झालेल्या बैठकीत याबाबात निर्णय घेण्यात आला. दि. बा. पाटील यांच्या नावाला आपला कधीच विरोध नव्हता असेही याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले....

सुरुवातीला नवी मुंबई विमानतळाला (new mumbai international airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे देण्यात यावे असा प्रस्ताव पुढे आला होता. यानंतर नवी मुंबई येथील स्थानिक चांगलेच आक्रमक झाले होते. अनेकदा मोर्चेही निघाले होते.

मात्र, आज प्रकल्पग्रस्त (Project affected) आणि आग्री, कोळी, कुणबी आदी समाजातील नेत्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे मान्य केले.

जे नाव दिले ते एकनाथने दिले माझा त्याला विरोध नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे रायगड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

कोण होते दि. बा. पाटील?

रायगड (Raigad) तालुक्यातील लोकनेते अशी ओळख दि. बा. पाटील यांची होती. त्यांचं मूळ नाव दिनकर बाळू पाटील असं आहे. १३ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म नवी मुंबईतील उरणजवळील जासई या गावी झाला होता.

ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते.

सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे हे नेते होते.

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी.

शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता.

पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले.

दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com