Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto, Video : हजारो कलाकारांच्या संगीत स्वरांनी गोदाघाट दुमदुमला

Photo, Video : हजारो कलाकारांच्या संगीत स्वरांनी गोदाघाट दुमदुमला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन वर्षानंतर नाशिकचा गोदाघाट (Godaghat) तबला, गायन, बासरी, कथ्थक नृत्य व भरतनाट्यम आणि संगीताच्या स्वरांनी फुलला होता, निमित्त होते नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या अंतर्नाद कार्यक्रमाचे (Nav varsh Swagat Yatra Samiti’s Antarnad program).

- Advertisement -

आज (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी ६ वाजता, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांना समर्पित अंतर्नाद १ हजार कलाकारांचे भारतीय शास्त्रीय गायन, नृत्य, वादन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी, नाशिक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पं. शौनक अभिषेकी हे उपास्थित होते.

तसेच उद्योजक निखील जोशी, तुषार शेजपाल, मंगेश पिंगळे, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे मंचावर उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, या कार्यक्रमामध्ये नमन गणेशा हे प्रथमेशा ही नांदी, सरस्वती वंदना, नांदी, बासरीवर राग वृंदावनी सारंग, केदार आलाप, ताना सहित, त्रिताल, राग देस, ताल तीन ताल, तराना, नगमा, राग भूप, बंदिश, अंतरा गायन, कथ्थक तबला जुगलबंदी यासंह अनेक कलांचे सादरीकरण करण्यात आले.

तसेच श्री रामचंद्र कृपाळू भजमन, पायोजी मैने राम रतन धन पायो, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील तबला, गायन, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम यांचे अनेक दिग्गज व प्रतिष्ठित गुरुकुल यात सहभागी झाले होते.

यावेळी संगीत समन्वय नितीन वारे आणि नितीन पवार यांनी केले तर अंतर्नाद कार्यक्रमाचे सर्व नियोजन अंतर्नाद प्रमुख निनाद पंचाक्षरी व सहप्रमुख केतकी चंद्रात्रे यांनी पहिले. तर जयेश कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, गौरव तांबे, दिगंबर सोनावणे, सुजित काळे, रूपक मैंद, कमलाकर जोशी, आशुतोष इप्पर, कुणाल काळे, अमित भालेराव, अथर्व वारे, अद्वय पवार, सौरभ ठकार या गुरूंच्या विद्यार्थ्यांनी तबलावादन केले, तर माधव दसककर, ज्ञानेश्वर कासार, हेमा नातू, रसिका नातू, अर्चना अरगडे, जाई कुलकर्णी, मुक्ता धारणकर, सुवर्णा बडगुजर, जयश्री शिंदे, प्रज्ञा वनीकर, प्रीतम नाकील, स्मिता जोशी, अनघा माळी या गुरूंच्या विद्यार्थ्यांनी गायन कला प्रस्तुत केली.

त्याचबरोबर सुमुखी अथणी, कीर्ती भवाळकर, कीर्ती शुक्ल, शिल्पा सुगंधी, निवेदिता तांबे, तृषाली पाठक, ऋतुजा चंद्रात्रे, हरविशा तांबट, श्रावणी मुंगी, वृषाली कोकाटे, सोनाली बन्नापुरे या गुरूंच्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण प्रस्तुत केले. तसेच शिल्पा देशमुख, सोनाली करंदीकर, सोनाली शहा, प्राजक्ता भट, सारिका खांडबहाले, अर्चना बढे, पल्लवी जन्नावार या गुरूंच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम कला सादर केली, तर अनिल कुटे, मोहन उपासनी, रवी जोशी, सुहास वैद्य या गुरुंच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर बासरीवादनाची कला प्रस्तुत केली. दरम्यान, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, योगेश गर्गे, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

कलाकारांमध्ये एकी किती असते याच एक उत्तम उदाहरण म्हणजे अंतर्नाद कार्यक्रम,अशा प्रकारचे कार्यक्रम जर घडत असतील तर मला नक्कीच दरवर्षी या कार्यक्रमाला यायला आवडेल, बाजूने स्वच्छंद वाहणारी गोदावरी आणि अंतर्नाद चा सूर हा खूप उत्तम मिलाप आहे. आज इथे येऊन एकप्रकारे माझा भ्रम तुटला, इतके दिवस हे कार्यक्रम फक्त पुण्यात होतात असे मला वाटत होते पण आज नाशिक मध्ये प्रत्यक्ष पाहून मी धन्य झालो, मला दरवर्षी या कार्यक्रमाला यायला नक्की आवडेल. या समितीने अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी राबवावे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल

“- पंडित शौनक अभिषेकी

- Advertisment -

ताज्या बातम्या