Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानिसर्ग पर्यटनस्थळांचा विकास होणार

निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास होणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्रातील भरतपूर अशी ख्याती असलेले नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य Nandurmadhyameshwar Sanctuary आणि नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाला Pench Tiger Project in Nagpur ६ कोटी १८ लाख रुपयांचा निधी Distribution Funds वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागाने Department of Revenue and Forests घेतला आहे. यामुळे पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे.

- Advertisement -

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाला निधी उपलब्ध देण्यात आला आहे. या निधीतून विविध विकासकामे केली जातील.

नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पा विषयी

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर १९११च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसराला १९८६मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी या अभयारण्यास महाराष्ट्रातील भरतपूर अशा शब्दात गौरवले होते.

नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे , दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे हे क्षेत्र महत्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सहादहित जंगल आणि माळरान परिसर आहे. ४०० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेते, नदी काठची हिरवाई देशी विदेशी पक्ष्याना आकर्षित करते. राज्यातील पहिले रामसर आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणारे नाशिक जिल्ह्यातील पाणथळ अर्थात नांदूरमधेश्वर वन्यजीव अभयारण्याने बहुमान पटकावला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पात जैवविविधता

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचा पेंच व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न असून या ठिकाणी गोंड आणि भिल्ल आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. नागपूरहून ७० किमी अंतरावर असलेले पेंच अभयारण्य निसर्गप्रेमी, पक्षी निरिक्षकांना आणि पर्यटकांना नेहमी खुणावत असते. या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रे, तरस, कोल्हे, सांबर, हरणे, गवे, नीलगाई, चार शिंग असलेले काळवीट, अस्वलांचे वास्तव्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या