राष्ट्रीय अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान संस्था नाशिकला व्हावी

खा. हेमंत गोडसे यांचे राज्यमंत्र्यांना साकडे
राष्ट्रीय अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान संस्था नाशिकला व्हावी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

भारत हा कृषीप्रधान देश (Agricultural country) असून शेती निगडीत व्यवसायात (agriculture related business) महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. शेतपिकावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत नाशिक जिल्हा (Nashik District) अव्वल क्रमांकावर असून 80 टक्के कुटूबियांचा उदरनिर्वाह (Subsistence) शेतीवर (Farming) अवलंबून आहे.

यासाठी नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना (Establishment of Food Processing and Technology Institute) करावी, असे साकडे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद पटेल (Union Minister of State for Food Processing and Industries Pralhad Patel) यांना घातले आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अन्न प्रक्रियेची क्षमता असलेल्या पहिल्या चार राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यात भात (Rice), गहु, मका, बाजरी, कांदा (Onion) या पिकांसह पालेभाज्या (vegetables) तसेच द्राक्ष (Grapes), डाळिंब, आंबा या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. कांदा आणि द्राक्ष या फळपिकांसाठी तर संपूर्ण देशात नाशिक अव्वल क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यंत्रणा नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांना (Farmers) त्यांच्या कच्चा मालावर प्रक्रिया करता येत नाही. परिणामी त्यांना आपला माल परदेशात निर्यात करावा लागतो. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आर्थिक भरभराटीचा वेग मंदावला आहे. यासाठी शेतकर्‍यांनी खा. गोडसेंकडे जिल्ह्यात अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यासाठी सातत्याने तगादा लावला आहे.

शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेवून खा.गोडसे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. नाशिक जिल्ह्यात शेतीमालाबाबत सविस्तर चर्चा करत शेतकरी हितासाठी याठिकाणी अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना केल्यास शेतकर्‍यांकडे असलेल्या कच्च्या मालावार प्रक्रिया करणे सोपे होईल. यातूनच शेतकर्‍यांची आर्थिक भरभराटीस निश्चितच चालना मिळणार आहे.

जिल्ह्यात वाहतूकीसाठी लागणारी कनेक्टीव्हीटी मोठी असून याचा फायदा अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेला होणार आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेवून केंद्र शासनाने नाशिक येथे या संस्थेची स्थापना करावी, असे सांगितले. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली.

Related Stories

No stories found.