राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी पताका

राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट गायक; किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी पताका

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा (Announcement of 68th National Film Awards) नवी दिल्लीत करण्यात आली. यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी ( Marathi Film )बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने निर्मिती केलेल्या ‘जून’ या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर गोदाकाठ आणि अवांछित या दोन चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नॉन फिचर्स फिल्म या विभागात कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला. तरसामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ची निवड करण्यात आली.

अजय देवगण, सूर्या सर्वोत्कृष्ट अभिनेते

यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने आपले नाव कोरले आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांना संयुक्तरीत्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजय देवगणला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ तर सूर्याला ‘सुरुराई पोटू’ या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड विभागून देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com