नाशिकचे तापमान पुन्हा घसरले

नाशिकचे तापमान पुन्हा घसरले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकचे किमान तापमान पुन्हा 11 अंशावर आले असून कमाल तापमानही 27.5 अंशावर आल्याने नाशिक पुन्हा गारठले ( Cold in Nashik City)आहे.

त्यातच दिवसभर थंंड वारे वाहत असल्याने गारठा वाढला आहे. उत्तरेतील थंडी कोकणात पाझरत असल्यामुळे मुंबई उपनगर व ठाण्यात सध्या कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने घसरण झाली असून ह्याच कारणास्तव थंडी जाणवत आहे.

तसेच आज (दि.25) जानेवारीला महाराष्ट्रात काहीसे ढगाळ वातावरण असेल. उद्या सध्या जात असलेले पश्चिमी झंजावात दि.26-27 ला तर 28-29 ला येणारे 30-31 ला उत्तर भारतात पाऊस-बर्फ पडल्यानंतर थंडी जाणवू शकते,असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांंनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com