Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचा पारा पुन्हा घसरला

नाशिकचा पारा पुन्हा घसरला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात गेल्या काही दिवसात किमान तापमानाच्या सरासरीत लक्षणिय वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. किमान पारा वर गेल्याने दिवसभर चटका बसत असून रात्री थंडीचा अनुभव सर्वांना येत आहे.

- Advertisement -

या बदलत्या हवामानात काल (दि.21) नाशिक जिल्ह्यात 11.4 अंश सेल्सीअस अशी राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडला 10.2 अंशांची नोंद झाली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपूर्वी बहुतांशी भागात किमान तापमानात लक्षणिय वाढ होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यात सर्वाधिक नुकसान ही नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांचे झाले होते. तसेच राज्यात इतर शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते.

यानंतर मात्र थंडी गायब होऊन किमान तापमान 15 ते 20 अंशापर्यत गेले होते. अजुनही राज्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणिय वाढ होत आहे. अशा वातावरणात देखील नाशिकचा किमान तापमान आज 11.4 अंशी नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या