भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नाशिकरोड | Nashikroad

भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo yatra) माध्यमातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरुवात केली आहे. त्यांच्या या यात्रेला देशातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे...

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडच्या (Nanded) देगलुरमध्ये भारत जोडोचे आगमन झाले झाले असून ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जात आहे.

या यात्रेदरम्यान नाशकातील एका तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. नाशिकमधील तरुणीला तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियात (Air India) नोकरी मिळाली. यानंतर ७ सप्टेंबरला तिच्या नोकरीची होती. परंतु याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सुरुवात होणार होती.

भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
घटस्फोटानंतर समांथा, नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र?

नोकरीवर रुजू होण्यासाठी ती ६ सप्टेंबरला कोलकाता येथे जायला निघाली. मुंबई विमानतळावर आल्यानंतर तिला नोकरी की भारत जोडो यात्रा, यापैकी कसली निवड करायची? हे समजत नव्हते. शेवटी तिने नोकरीवर न जाता भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आतिषा पैठणकर (Atisha Paithankar) असे या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी नाशिकरोड येथील रहिवाशी आहे. आतिषाच्या आई-वडिलांना वरील गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या रागाचा सामनाही आतिषाला करावा लागला.

भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
शिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

परंतु एक महिन्यात मी पुन्हा परत येऊन नोकरी करेल, असा शब्द तिने आपल्या पालकांना दिला. यानंतर तिने थेट कन्याकुमारी गाठले आणि भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. या तरुणीची आता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com