Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; पाच खेळाडूंचा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये विक्रम

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; पाच खेळाडूंचा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये विक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दक्षिण अफ्रिकेतील (South Africa) ‘कॉम्रेड’ स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या टाटा अल्ट्रा 50 किमी अल्ट्रा मॅरेथॉन (Ultra marathon) नाशिकच्या 5 जणांच्या चमूने यशस्विरित्या पूर्ण केली. त्यामुळे ‘कॉम्रेड’ला (Comrade) जाण्याची तयारी गतीमान झाल्याचे आर्यनमॅन महेंद्र छोरीया (Mahendra Chhoria) यांनी सांगितले…

- Advertisement -

टाटा अल्ट्रा 50 किमी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पूण्याच्या लोणावळा घाटात घेतली जाते. या स्पर्धेत 50 किमी धावणे हे एक आव्हान असते. धावण्याच्या शेवटच्या टप्प्यात जवळपास 1100 मीटर चा प्रवास हा अतिशय खडतर आहे.

Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

शेवटच्या 41 ते 50 किमीच्या रस्त्याचा चढ हा जिवघेणाच ठरतो. यात तूमच्या शारीरिक तसेच तुमच्या मानसिक बळावर परिणाम होतो, पण नंतर चिकाटी आणि रोजची कठोर कसरत या बळावर हा मार्गही 6 तास 13 मिनिटांच्या विक्रमी वेळेत सहज पूर्ण केला.

स्ट्रायडर्स ग्रुपद्वारे (Striders Group) या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव असल्याने चांगल्या प्रकाराने स्पर्धा झाली. या स्पर्धेत नाशिकहून 6 जणांनी सहभाग घेतला होता. त्यात आर्यनमन चेतन अग्निहोत्री, आर्यनमन महेंद्र छोरीया, हेमंत अपसूंदे, उमेश बूब, दिगंबर लांडे, डॉ. विलास देशमुख यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करीत ‘कॉम्रेड’च्या तयारीवर शिक्कामोर्तब केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या