नाशिकची हवा गुणवत्तापूर्ण; दिवाळीत प्रदूषणाचा वाढला टक्का

नाशिकची हवा गुणवत्तापूर्ण; दिवाळीत प्रदूषणाचा वाढला टक्का
USER

नाशिक । रवींद्र केडीया Nashik

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) Central Pollution Control Board उपलब्ध आकडेवारीनुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत Diwali Festival मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते. त्यामुळे मागच्या वर्षाच्या तूलनेत प्रदूषणाचा स्तर वाढण्याची शक्यता असली तरी नाशिकच्या हवेची गुणवत्ता फारशी खराब नसल्याने यंदाच्या दिवाळीनंतरही टक्का फार घसरला नसल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या दिवाळीत वाढलेल्या वायू प्रदूषणाचा Air Pollution टक्केवारीनुसार देशातील बहुतांश शहरे प्रदूषित म्हणून नोंदविण्यात आली आहेत. यात राज्यातून मध्यम प्रदूषित श्रेणीत नाशिक सह कल्याण, नवी मुंबई या शहरांचा समावेश आहे. तर साधारण प्रदूषित श्रेणीत चंद्रपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि औरंगाबाद शहरांचा समावेश आहे. या वर्षी प्रदूषणात मागील वर्षीच्या तुलनेत 13 ते 50 टक्के वाढ झाली असली तरी अत्याधिक

वायू प्रदूषणाच्या गुणवत्ता निर्देशांक 401-500या धोकादायक टप्पात गेलेले राज्यातील एकही शहर नसल्याचे दिसून येत आहे.

प्रदूषण मंडळाच्या साईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (क्यू आय) मागील वर्षी 8 नोव्हेंबरपर्यंत समाधानकारक श्रेणीत होता. यंदाच्या वातावरणातील बदल पाहता मध्यम श्रेणीत गेला असण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळी मागील वर्षाच्या तुलनेत लक्ष्मी पूजनाच्याच दिवशी फटाके जास्त प्रमाणात वाजले. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत हवेचे प्रदूषण वाढून फार फारतर मध्यम गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, 50 पर्यंतचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम मानला जातो. 51 ते 100 मधील निर्देशांक समाधानकारक, 101 ते 200 दरम्यानचा निर्देशांक मध्यम मानला जातो. त्याच्या पुढे हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. त्यात प्रामुख्याने 201 ते 300 च्या दरम्यानचा इंडेक्स हा खराब गटात येतो. तर 301 ते 400 दरम्यानचा इंडेक्स हा अतिशय खराब मानला जातो. त्याही पूढे 400 पेक्षा जास्त इंडेक्स हा गंभीर स्वरुपात गणला जातो.

मागिल वर्षातील दिवाळी काळात म्हणजेच 13 आणि 14 नोव्हेंबर दरम्यान 100 पेक्षा कमी म्हणजेच समाधानकारक श्रेणीत होता. करोना प्रादुर्भाव असल्याने लोकांनी दिवाळी साधेपणाने साजरी केली होती. मात्र यंदाच्या दिवाळीत मागील दोन वर्षाच्या शिथिलतेनंंतर उत्साहाचे वातावरण होते. लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या दोघांनीही नाशिककरांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी वारंवार प्रबोधनही केले होते. कारण फटाक्यांच्या आवाजातून ध्वनीप्रदूषण व ज्वलनातून वायूप्रदूषण वाढून शहरातील हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची भीती निर्माण वर्तवण्यात आलेली होती.

फटाक्यांचे दु:ष्परिणाम

फटाके बनविताना अनेक धातू आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्यात सल्फर, झिंक, कॉपर, सोडियम, लीड, मॅग्नेशियम, केडनियमसारखे धातू वापरले जातात. आवाज आणि रंग येण्यासाठी वापरलेल्या घटकांतून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. त्यात सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेट्सचा समावेश असतो.आवाजाची तीव्रता 60 डेसिबलच्या वर गेल्यास कानाचे विकार व मानसिक आजार होऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com