Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्हा परिषदेचे 'असे' आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

नाशिक जिल्हा परिषदेचे ‘असे’ आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. एकूण ८४ गटांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सहा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे…

- Advertisement -

त्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने, तीन गट महिलांसाठी राखीव असणार आहेत. ३३ गट अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. ३३ गटांपैकी १२ गट याआधी महिलांसाठी आरक्षित असल्याने, ते गट वगळण्यात आले आहे.

उरलेल्या २१ पैकी १७ गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण ५ गट होते. मात्र, ३ गट आरक्षित करायचे असल्याने, चिठ्ठी काढून ३ गट आरक्षित करण्यात आले.

त्यातील ५० टक्के महिलांसाठी आरक्षण असल्याने ३ पैकी २ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. सर्व साधारण गटातील ४२ पैकी २० जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत या ४२ पैकी २४ गटांना आतापर्यंत महिला आरक्षण नव्हते. त्यामुळे या २४ गटांमधून २० गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

या आरक्षण यादीवर उद्यापासून २ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील. हरकतींची पडताळणी करून ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. या गटांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या