Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रतीन कोटीचे सोने लुटणाऱ्या नाशिकच्या सूत्रधारास अटक

तीन कोटीचे सोने लुटणाऱ्या नाशिकच्या सूत्रधारास अटक

सातारा :

केरळ राज्यातील बँक दरोडा (bank robbery) प्रकरणी चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सातारा पोलिस (police)व केरळ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. अटकेत असलेल्या चार जणांपैकी तीन जण पैलवान असून मुळ सूत्रधार नाशिकचा(nashik) आहे.

- Advertisement -

नाशिकच्या व्यापाऱ्याची १९ कोटीत फसवणूक

केरळमधील एका बँकेतील तब्बल साडेसात किलो सोने दरोडेखोरांनी चोरल्या प्रकरणाचा गुन्हा केरळमध्ये दाखल होतो. या तपासात निखिल जोशी (रा. नाशिक)हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपास स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी निखील जोशीकडे (nikhil joshi) आपला मोर्चा वळवला. परंतु तो सातत्याने ठिकाण बदलवत असल्याचे लक्षात आले. या प्रकरणात निखिल जोशी (रा. नाशिक)(nikhil joshi, nashik)सोबत सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे (सर्व रा.सातारा) हे तिन्ही संशयीत आहे.

असा लागला पोलिसांना शोध

केरळ पोलिसांच्या तपासात नाशिक येथील निक उर्फ निखिल जोशी (nikhil joshi)या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. निखिल जोशी सातत्याने ठिकाणे बदलवत होता. तो सध्या सातारा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर केरळ पोलिस शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली आणि संशयित सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी केरळ पोलिसांच्या मदतीला देण्यात आले.

प्राथमिक तपासानंतर केरळला नेले

शोध घेताना संशयित आरोपी साताऱ्यात एका हॉटेलमध्ये आपल्या तीन साथीदारांसह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत नाशिक येथील मुख्य संशयित निखिल जोशी (nikhil joshi)आणि त्याच्या सातारा-कोरेगाव येथील तीन पैलवान सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. साताऱ्यात प्राथमिक चौकशी करून त्या चौघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. केरळ पोलीस त्यांना घेऊन गेले असून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील निखिल जोशी (nikhil joshi)गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असला तरी साताऱ्यातील युवकांचा त्यात सहभाग किती आहे हे तपासात समोर येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या