Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचा नंदुरबारवर विजय

नाशिकचा नंदुरबारवर विजय

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) राज्यस्तरीय 14 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (Invitational Cricket Tournament) (Invitational League),

- Advertisement -

दोन दिवसीय कसोटी सामन्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकने (nashik) नंदुरबारवर (Nandurbar) 1 डाव व 167 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महात्मानगर क्रिकेट मैदानावर बीडने स्टार, पुणे (pune) विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने (nashik) नंदुरबार (nandurbar) विरुद्ध पहिल्या डावात नैतिक घाटे (नाबाद 159) व नील चंद्रात्रे (नाबाद 100) यांच्या जोरावर केवळ 48 षटकांत 2 बाद 290 अशी धावसंख्या उभारली. दोन्ही गडी सोहम पाटीलने बाद केले. उत्तरादाखल नाशिकच्या देवांश गवळीचे 5 व व्यंकटेश बेहरेच्या 3 बळींमुळे नंदुरबारचा पहिला डाव 25.3 षटकांत 56 धावांत आटोपला. हुजेफा मर्चंट व प्रिन्स पटेलने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

फॉलोऑन नंतरही दुसर्‍या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी (Bowlers) नंदुरबारला 31.1 षटकांत गुंडाळून मोठा विजय मिळवून दिला. दुसर्‍या डावातही देवांश गवळीने 2 व व्यंकटेश बेहरेने 3 गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्यांना हुजेफा मर्चंट व नील चंद्रात्रेनेहि 2 बळी घेत छान साथ दिली. ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी केवळ 28 षटकांचाच खेळ होऊनदेखील नाशिक संघाने हे उल्लेखनीय यश मिळवले. महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या बीडच्या पहिल्या डावात स्टार, पुणे विरुद्ध 189 धावा झाल्या.

वेंकटेश हुरकुडेने 95 व शौर्य जाधवने 52 धावा केल्या.स्टारच्या आर्यन घोडकेने 6 बळी घेतले. उत्तरादाखल स्टारने आर्यनने अष्टपैलू चमक दाखवत केलेल्या 54 व आर्यन लोंढेच्या 46 धावा यांच्या जोरावर 166 पर्यंतच मजल मारल्यामुळे बीडला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा 9 गटात एकूण 36 संघांमध्ये या स्पर्धा रंगत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या