जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दैनिक ‘देशदूत’चा नाशिक वनराई उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दैनिक ‘देशदूत’चा नाशिक वनराई उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी

पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने 5 जून ला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधत दै 'देशदूत' नाशिक वनराई हा उपक्रम हाती घेत आहे.

या उपक्रमांतर्गत दै. 'देशदूत' तर्फे सर्व खाजगी, सरकारी, सेवाभावी संस्था आणि सर्व नाशिककरांना येत्या 5 जून ला म्हणजेच पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या अवती भोवती, इमारतीत, घराशेजारी, गच्चीवर जेथे कोठे नागरिक वृक्षारोपण करू शकतात तेथील वृक्षारोपणाचा फोटो आणि पर्यावरण दिनानिमित्त एक संदेश व्हिडिओ स्वरूपात पाठवायचा आहे.

निवडक फोटो आणि व्हिडीओ ला देशदूत च्या माध्यमातून प्रसिध्दी देण्यात येणार आहे. आपले फोटो / व्हिडिओ आपण 9890897795 या क्रमांकावर अथवा gogreendeshdoot.com या मेल आईडी वर पाठवू शकता. यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणी साठीwww.deshdoot.com या वेबसाईट वर आपण संपर्क करू शकता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com