नाशिकमध्ये रांगा : लसीकरण कोरोना रोखणारे की कोरोनाला आमंत्रण देणारे ?

कुठे आहे सोशल डिस्टेंसिंगचे पालन ? आज ४, ७९५ जणांचे लसीकरण
नाशिकमध्ये रांगा : लसीकरण कोरोना रोखणारे की कोरोनाला आमंत्रण देणारे ?

नाशिकNashik

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकमधील (nashik vaccination centre) लसीकरण थांबले होते. त्यानंतर आज लसीकरण सुरु झाले. दिवसभरात नाशिक जिल्ह्यात ४७९५ जणांनी लसीकरण केले. परंतु लसीकरणासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या. यावेळी सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नव्हते. केवळ शासकीय केंद्रांवर लसीकरण (vaccination) झाले. मुख्यमंत्र्यांनी ३० एप्रिल रोजी केलेल्या भाषणात लसीकरणासाठी गर्दी करु नका, असे आवाहन केले होते. परंतु लसींचा साठा नसल्यामुळे गर्दी होत आहे. त्यात शासनाचे नियोजन चुकत आहे. यामुळे लसीकरण कोरोना रोखणारे की कोरोनाला आमंत्रण देणारे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेकडून लसीकरण मोहीम शनिवार(दि १) पासून थांबविण्यात आली होती. त्यानंतर तब्बल चार दिवसांनी ५ मे रोजी लसीकरण सुरु केले. लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर सुरु झाले. ESIC रुग्णालयात सर्वाधिक ३२९ जणांना लसीकरण करण्यात आले. इंदिरा गांधी रुग्णालयात २६८ तर हिरावाडीत २०४ जणांचे लसीकरण झाले. मायको पंचवटीत २३४ तर वडाळात ३०७ जणांचे लसीकरण झाले.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्डचे जिल्ह्याला एक लाख ५९ हजार, तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे ६८ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस उपलब्ध झाल्याने चार दिवसांपासून बंद पडलेले लसीकरण आजपासून सुरू झाली आहे.

ऑनलाईन नोंदणी बंदच

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी गेल्या तीन दिवसांपासून होत नाही. शासनाच्या https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर अनेक केंद्रांवर लसीकरण नसल्याचे दिसत आहे. ज्या मोजक्या केंद्रांवर दिसत आहे, ते ही बुक दाखवत आहे.

नाशिकमध्ये रांगा : लसीकरण कोरोना रोखणारे की कोरोनाला आमंत्रण देणारे ?
सुप्रीम कोर्टाने म्हटले, ५० टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी वैध आधार नव्हता
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com