Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागुडन्यूज : नाशिकहून हैदराबाद व दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत, बुकिंग सुरु; इथे...

गुडन्यूज : नाशिकहून हैदराबाद व दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत, बुकिंग सुरु; इथे पाहा वेळापत्रक

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

करोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा (Air Service) पुन्हा एकदा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवेचे बुकिंग (Ticket Booking) सुरु झाले आहे. नाशिक – हैदराबाद विमानसेवा येत्या २२ जुलै तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून पुन्हा सुरळीतपणे विमानांचे उड्डाण होणार आहे…(Nashik Delhi an Nashik Hyderabad flight will be start soon)

- Advertisement -

आजपासून (दि ०६) ऑनलाईन तिकिट बुकींग (Online Ticket booking) प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी देशदूतला दिली. ही विमानसेवा स्पाईस जेट (Spice Jet) कंपनीकहून पुरवण्यात असून नाशिक -हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक -दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक -हैद्राबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारी,उद्योजक उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र शासनाच्या उडान 2 योजनेअंतर्गत (central government udan scheme) नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे यासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godase) यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते.

यासाठी खासदार गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवला होता. तत्कालीन मंत्री महोदय आणि नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले होते.

खासदार गोडसे (MP Hemant Godase) यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून (Ozar airport) प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला होता. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योजकांकडून या हवाई विमानसेवेला दोन वर्ष भरभरून प्रतिसाद मिळाला होता. परंतु कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती.

विमानसेवा बंद झाल्याने नाशिकसह धुळे ,जळगाव आणि अहमदनगर येथील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक – हैदराबाद, नाशिक – दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार गोडसे (Nashik MP Hemant Godase) यांनी काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा येत्या २२ जुलै पासून तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती स्पाईस जेट प्रशासनाने खा. गोडसे यांना कळविली आहे.

नाशिक -हैदराबाद विमानसेवा (nashik hyderabad flight) शनिवार वगळता रोजच तर नाशिक – दिल्ली विमानसेवा (nashik delhi flight) रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद – नाशिक (nashik hyderabad flight) हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे.

दिल्ली -नाशिक (Delhi to Nashik) हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे.

नाशिक – हैदराबाद (nashik hyderabad flight) या विमानात प्रवाशांची क्षमता 80 असणार असून हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांचा रहाणार आहे. तर नाशिक -दिल्ली विमानात विमानात 189 प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या