Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : ३० तासांत ३० लाखांचा छडा; दोन जेरबंद

Video : ३० तासांत ३० लाखांचा छडा; दोन जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या (Nashik Taluka Police Station) पथकाने सुरत (Surat) येथून ३० लाखांच्या मुद्देमालासह २ जणांना अटक (Arrested) केली आहे. पोलिसांनी ३० तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे…

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक मध्ये (एमएच ०४ जी. आर. ८९४६) कौशर टेक्सटाईल्स, पुलगाव जि. वर्धा येथुन आरकेन इंटरनॅशनल लिमिटेड भिवंडी येथे पोहचविण्यासाठी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल ट्रक मध्ये देण्यात आला होता.

हा माल त्याठिकाणी पोहच न करता संशयित कोठेतरी परस्पर त्याची विल्हेवाट लावून रिकामा आयशर ट्रक विल्होळी गावाजवळ मुंबई आग्रारोडवर बेवारस सोडून निघून गेले होते. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात अमरबहादुर राम अभिलाश सिंग (४०, धंदा-ट्रान्सपोर्ट रा. रूम नंबर १६११ साईकृपा रहिवासी संघचाळ चर्चरोड जवळ गणेशनगर मानपाडा, ठाणे पश्चिम) यांनी तक्रार दिली होती.

या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील (sachin patil) यांच्या आदेशाने नाशिक तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव (Sarika Ahirrao) यांच्याकडे देण्यात आला होता.

या गुन्हयातील संशयितांची गुप्त बातमीदारामार्फत माहिती संकलित करून गुन्हयातील संशयित हे सुरत, गुजरात येथे असल्याबाबत माहिती मिळाली. वपोनी अहिरराव यांनी या गुन्हयाच्या तपासामध्ये एक तपास पथक तयार करून बातमीप्रमाणे सुरत, गुजरात येथे पाठविले होते.

गुन्ह्यातील आणखी संशयित करण दिनदयाल सोळंकी (वय २१ रा. बी ५०८ सिताराम सोसायटी पर्वत घापी कॉलनी सरत, राज्य गुजरात मुळ रा. शुरसागर पुरानी भाकरी वास मानिबस्ती ता जि. जोधपुर राज्य राजस्थान ) आणि दुसरा संशयित जयेश मनोहरलाल जैन (वय – ३० रा. साई कॉम्प्लेक्स २०३/२०४ महादेव मंदीर ता. उधणा जि. सुरत राज्य गुजरात) यांना पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हयातील रक्कम रूपये ३० लाख ३० हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला असून न्यायलयाने दोन्ही सशयितांना पाच दिवस कोठडी दिली आहे. गुन्ह्यातील आणखी संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहेत.

ही कामगिरी पोलिस उपनिरिक्षक दिपक देसले, पोलिस हवालदार मनोज बच्छे, पोलिस नाइकरविंद्र मल्ले, पोना दिपक पाटील, पोकॉ जगदिश जाधव यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या