Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबदली रद्द; पोलीस अधीक्षक सचिन पाटलांचीच नाशकात 'पाटीलकी'

बदली रद्द; पोलीस अधीक्षक सचिन पाटलांचीच नाशकात ‘पाटीलकी’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Nashik Superintendent of Police Sachin Patil) यांच्या बदलीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. डिसेंबरअखेर बदलीबाबत निर्णय घेण्याबाबत निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील नाशिककरांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे….

- Advertisement -

राज्यातील ३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात सचिन पाटील यांचा समावेश होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या थांबविण्यात आल्या. गणेश विसर्जनानंतर बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात येणार होते. मात्र, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळे बदली रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या जिल्हावासीयांनी आनंदोत्सव साजरी केला.

काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक पाटील यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात उपायुक्तपदी बदली झाली होती. अधीक्षक पाटील यांच्या जागी शहाजी उमाप पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र, त्या अगोदरच हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळे उमाप यांना पुन्हा कुठे पाठवणार याबाबत अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

पोलिस अधिक्षक पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे सत्र राबविले होते. शेतकरी व सामाजिक संस्थांकडून चांगले स्वागत झाले होते. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळींब, कांदा, टोमॅटो तसेच अन् पिकांची मोठ्या प्रामणात निर्यात होते. उत्तर भारत तसेच बागंलादेशला हा माल पाठविला जातो. त्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. मात्र पैसे देतच नाहीत किंवा पैसे देताना फसवणूक करतात. त्यावर पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देऊन कार्यरत केले होते.

जिल्ह्यातील अनेक संघटनांनी पालकमंत्री भुजबळ तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदली रद्द करण्याबाबत निवेदने देऊन बदली रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी शहरात महत्वाच्या ठिकाणी फळकबाजी देखील करण्यात आली होती. हायकोर्टाने स्थगिती थांबविण्याबाबत सांगितल्यानंतर जिल्हावासीयांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या