आता गावं तिथं एसटी पोहोचणार; 'इतके' कर्मचारी कामावर रुजू

नाशिक विभागात ८० टक्के कर्मचारी कामावर रुजू
आता गावं तिथं एसटी पोहोचणार; 'इतके' कर्मचारी कामावर रुजू
ST Bus

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एसटी कर्मचार्‍यांचे (ST Workers) सरकारी सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धार आता ९० टक्के कमी झाली आहे....

७० हजारावर कर्मचारी रुजु झाल्याने २२ एप्रिलपासुन एसटीचा गाडा रुळावर येण्यास मदत झाली आहे. न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत रुजु होणार्‍या कर्मचार्‍याांवरील कारवााई मागे घेण्याचे आदेश दिल्याने बहुतांश कर्मचारी आता रुजु होत आहे.

मुंबई सेन्ट्रल (Mumbai Central) येथील आगार (Depot) पुर्ण क्षमतेने सुरु झाले आहे. आता राज्यातील निर्बंध उठले आहे. पर्यटनस्थळे (Tourist Places) खुली झाली आहे. नागरिकांना दोन वर्ष कोठेही जाता आले नाही ते आता उन्हाळी सुटीत पर्यंटनाची तयारी करत आहे.

तसेच संप मिटण्याची चिन्हे दिसु लागल्याने सहाजीकच प्रवाशांची पावले बस स्थानकाकडे वळु लागणार आहे. ज्याची ते वाट पहात होते. ती वेळ आता आली आहे. एसटी महामंडळांच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच एवढा दिर्घ संप झाला.त्याचीही इतिहासात नोंद होणार आहे.

Related Stories

No stories found.