अशा ‘स्मार्ट’ कामांना नागरिक वैतागले, लावले काम थांबवण्याचे फलक

अशा ‘स्मार्ट’ कामांना नागरिक वैतागले, लावले काम थांबवण्याचे फलक

नाशिक Nashik

आपलं शहर स्मार्ट (smart city )असावं, अशी प्रत्येक शहवासीयांची अपेक्षा असते. परंतु चुकीच्या आणि रेंगाळलेल्या कामांमुळे वैताग आल्यावर हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांना (citizen) करावी लागते. काहीशी अशीच परिस्थिती नाशिकमधील (nashik) मुख्य रस्त्यांची झाली आहे. दहीपूल बाजारपेठेतील रस्ते खोदून त्याची उंची काम केली आहे. यामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात (Shop) व रहिवाश्यांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. यामुळे स्थनिक नागरिकांनी काम थांबवण्याची मागणी करणारा फलकच लावला आहे.

अशा ‘स्मार्ट’ कामांना नागरिक वैतागले, लावले काम थांबवण्याचे फलक
स्मार्ट सिटीच्या कामांची नाराजी प्रकाश थविल यांना भोवली, अखेरी उचलबांगडी

मुख्य रस्त्यावर असलेला पिंपळपार चौकात स्मार्ट सिटीचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हे काम त्वरित थांबवण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. त्यासाठी फलकाचा आधार घेतला आहे.

काय म्हटले आहे फलकावर

स्मार्ट सिटीच्या नावाखाली चुकीचे गैरसोयीची व त्रासदायक रस्त्यांचे काम त्वरित थांबवावे, तसेच आहे तसा रस्ता पुर्ववत करावा. फक्त पावसाचे पाणी साचणार नाही अशी ड्रेनजची व्यवस्था करावी, ही रहिवाशी, व्यापारी व नागरिकांची कळकळीची विनंती आहे.

नाशिकमध्ये (Nasik) चार वर्षांपासून स्मार्ट सिटी कंपनीची कामे सुरू आहेत. एकूण ५२ पैकी जेमतेम पाच ते सात प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कामांवर नागरिक, व्यापारी वर्गाकडून टीक होत आहे. लॉकडाऊननंतर (lockdown) दुकाने काही तासांसाठी उघडली असतांना रस्ते खोदून ठेवल्यामुळे ग्राहक दुकानांपर्यंत येऊ शकत नाही, वाहतूक ठप्प होत असते, असे अनेक प्रकार घडत आहे. मेनरोड परिसरात स्मार्टसिटीच्या अंतर्गत कामांची लगबग सुरु आहे. याठिकाणी मोठमोठे नाले खोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. अगदी अरुंद जागेतून प्रवास करून नागरिकांना खरेदी करावी लागते आहे. अशा परिस्थितीतही अनेकजण चारचाकी आणि दुचाकी वाहनांची नाहक गर्दी करतात. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना तर त्रास होतोच शिवाय वाहतूक कोंडीलादेखील सामोरे जावे लागते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com