स्मार्ट सिटीच्या कामांची नाराजी प्रकाश थविल यांना भोवली, अखेरी उचलबांगडी

स्मार्ट सिटीच्या कामांची नाराजी प्रकाश थविल यांना भोवली, अखेरी उचलबांगडी
नाशिक स्मार्ट सिटी

नाशिक :

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासारखी बेफिकीर वृत्तीची व्यक्ती पाहिली नाही. स्मार्ट सिटी कंपनी जणू वैयक्तिक कंपनी असल्याच्या थाटात ते अतिशय वाईट पध्दतीने कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत महापौर सतीश कुलकर्णी यांनी थविल यांची तत्परतेने बदली करावी, असा ठराव मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यानंतर लागलीच थविल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता सुमंत मोरे यांची नियुक्ती झाली आहे. थविल यांची प्रतिनियुक्त तत्काळ रद्द केली असून त्यांची रवानगी पुन्हा महसूल व वन विभागाकडे केली आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांची नाराजी प्रकाश थविल यांना भोवली, अखेरी उचलबांगडी
जून संपला, पाऊस फक्त १७ टक्के, पेरण्या संकटात

मंगळवारी (२९ जून) सर्वसाधारण सभेत प्रकाश थविल उपस्थित नव्हते. स्मार्ट कामांबाबतच्या तक्रारी मांडल्यानंतर उत्तरे देणारे जबाबदार व्यक्ती नसल्याने लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. स्मार्टसिटी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा उल्लेख करताना स्मार्टसिटीच्या नावाखाली शहर भकास केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्मार्ट योजनेतील कामांमुळे मध्यवर्ती परिसरात खोदकाम झाले आहे. त्याचे पडसाद मागील सभेत उमटल्यानंतर स्मार्ट योजनेतील कामांबाबत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत थविल यांची बदली करण्याचा ठराव संमत झाला आणि दुसऱ्याच दिवशी ३० जून रोजी बदलीचे आदेश निघाले.

दरम्यान, ३० जून रोजी थविल यांच्या बदलीची ऑर्डर अपर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले होते. सुमंत मोरे यापुढे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार पाहणार आहे. आज स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे नाशिक दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर थवील यांची बदली चर्चेचा विषय झाली आहे.

दरम्यान, याआधीदेखील चार वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम आणि त्यानंतर ठेकेदाराला प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड केल्यानंतर हा दंड रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय थविल यांच्या अंगाशी आला होता.

यादरम्यान, एकदा महासभेत याप्रकरणी कंपनीकडे खुलासा मागण्याचे आदेश महापोर सतीश कुलकर्णी यांनी दिले होते. गोदावरी नदीचे काँक्रिटीकरण करणे काढणे हे प्रोजेक्ट कामदेखील वादग्रस्त ठरले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com