नाशकात शिवसेना संघटनसाठी निष्ठावानांची एन्ट्री

नाशकात शिवसेना संघटनसाठी निष्ठावानांची एन्ट्री

नाशिक । Nashik

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ॲक्शन मोडमध्ये आले असून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निष्ठावानांना संधी देत जुन्या नव्यांची सांगड घालत जिल्ह्याच्या कार्यकारणीत फेरबदल केले आहेत..

शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक जयंत दिंडे (Jayant Dinde) यांच्यावर संपर्कप्रमुखाची तर अल्ताफ खान (Altaf Khan) यांच्यावर सहसंपर्कप्रमुखाची जबाबदारी टाकली आहे. तसेच मनमाडच्या गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) व येवल्याचे कुणाल दराडे (Kunal Darade) यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे.

तसेच या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

यात जयंत दिंडे - संपर्कप्रमुख - दिंडोरी लोकसभा, अल्ताफ खान- सहसंपर्कप्रमुख- दिंडोरी लोकसभा, सुनील पाटील जिल्हाप्रमुख - विधानसभा - दिंडोरी, कळवण, बागलाण; गणेश धात्रक - जिल्हाप्रमुख - विधानसभा - नांदगाव, मालेगाव (बाह्य), मालेगाव (मध्य); कुणाल दराडे जिल्हाप्रमुख विधानसभा - निफाड, येवला, चांदवड, यांचा समावेश आहे.

जिल्हा युवा अधिकारीपदी रंधवे

याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिंडोरी लोकसभेच्या (निफाड, चांदवड-देवळा, येवला - लासलगाव (४६ गाव) व नांदगाव विधानसभा) जिल्हा युवा अधिकारीपदी विक्रम रंधवे (Vikram Randhave) यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येईल, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com