शिवसेनेसह संंघटना बळकट करा : उद्धव ठाकरे

नाशिकच्या माजी नगरसेवकांनी घेतली ठाकरेंची भेट
शिवसेनेसह संंघटना बळकट करा : उद्धव ठाकरे

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील दोन आमदार व एक खासदाराने बंडखोर शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने आज शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी सर्वांना पक्ष संंघटना बळकट करण्यासोबतच शिवसेना (shivsena) वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले...

दोन दिवसापूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा नाशिकचा (Nashik) दौरा पार पाडला. त्यात त्यांना चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभवाला सामोरे जावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय वातावरणाविषयी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून नाशिकच्या माजी नगरसेवकांना आज भेटण्यासाठी बोलावणे आले होते. त्यांच्या या आदेशावरून नाशिकमधील ३३ हून अधिक माजी नगरसेवकांनी मुंबई (Mumbai) गाठत ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान, काही माजी नगरसेवकांनी (Corporators) उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनात हळहळ व्यक्त होत होती. साहेबांना भेटण्यासाठी उत्सुक होतो. तेव्हा आज निरोप आल्याने आम्हाला साहेबांना भेटण्यासाठी आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) विरोधीपक्ष नेता अजय बोरस्ते (Ajay Boraste) माजी आमदार वसंत गीते (Former MLA Vasant Gite) माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, मधुकर जाधव, हर्षदा जायकर,तसमा निगळ, नयना गांगूर्डे आदींसह पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com